लोणी दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील नांदुर बुद्रुक येथे कृषीकन्यांकडून ग्रामीण ( कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्यांनी येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण याविषयी मारगदर्शन केले. यावेळी कृषीकन्या त्रिवेणी खर्डे, प्रतीक्षा नागवडे, दिशा भालेराव, चेतना जाधव, तेजस भोंडवे या विद्यार्थीनींनी विविध प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्रित कृषी महाविद्यालय लोणी येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. संचालिका कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय व कृषी महाविद्यालय लोणीच्या प्राचार्या डॉ शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक डॉ .रमेश जाधव ,कार्यक्रम अधिकारी डॉ विक्रम अनाप व डॉ दिपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषीकण्या यांनी माती परीक्षण प्रक्रियासाठी मातीचा नमुना कसा द्यावा याबाबत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी गावातील शेतकरी अनिल भदे, धनंजय भदे, नितीन तावरे, गणेश जाधव, रोहित गलांडे, अमोल भदे व शेतकरी या मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.