12.1 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

मतदार संघाच्या विकासात जनतेचे मोठे योगदान – आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोपरगाव मतदार संघाच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुम्ही संधी दिली त्यामुळे मी आमदार होवू शकलो व मला मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा विकास साधता आला यामध्ये कोपरगावकरांचे व मतदार संघातील जनतेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केले.

आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध गणपती मंडळांना भेटी देवून त्यांनी स्थापना केलेल्या श्री गणेशाची आरती करून दर्शन घेतले व गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. यावेळी बजरंग मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथा कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी कोपरगाव करांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिव पुराण हे एक प्रमुख आणि प्रसिद्ध पुराण असून गणेशोत्सवानिमित्त बजरंग मित्र मंडळाने शिव महापुराण कथा कार्यक्रम आयोजित करून भाविकांना उपासना, रहस्य, शिवकथा, महिमा व भगवान शिवाशी संबंधित धार्मिक बाबीचे दर्शन घडविले हे कौतुकास्पद आहे. तसेच कोपरगाव शहराच्या झालेल्या विकासात कोपरगावकरांचे योगदान असल्याचा यावेळी त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासाचे रखडलेले प्रश्न सुटावे यासाठी आमदार नसतांना देखील मी प्रयत्न केले. वेळोवेळी आंदोलने देखील केली. माझे प्रयत्न प्रामाणिक असल्यामुळे मतदार संघातील जनता व संपूर्ण कोपरगावकर माझ्या सोबत होते. आपण माझ्यावर विश्वास दाखविल्यामुळे मी देखील विकसित कोपरगावचे स्वप्न कोपरगावकरांना दाखविले. ज्यामध्ये शहराचा पाणी प्रश्न सुटलेला असेल, रस्त्यांचा विकास झालेला असेल त्याच बरोबर नागरिकांना अपेक्षित असलेली विकास कामे पूर्ण होतील अशा विकसित कोपरगावचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मी निवडून आल्यापासून कामाला लागलो.

कोपरगावकरांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासातून सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हाती घेवून ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु केले. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी आणला. साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे हे सगळ्या कोपरगाव करांनी पाहिले आहे. शहरातील रस्ते विकसित होवून नागरिकांना होणारा त्रास कमी झाला आहे. शहराच्या सुशोभीकरणासाठी देखील निधी देवून अनेक शासकीय इमारतींना निधी दिला आहे. या इमारतींचे काम प्रगतीपथावर असून या शासकीय इमारती शहराच्या वैभवात भर घालणार आहेत. कोपरगाव शहराच्या विकासासाठी ३०० कोटी निधी मिळविण्यात यशस्वी होवून शहराचा विकास साधला यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संपूर्ण कोपरगावकरांचा सहभाग, मार्गदर्शन, योगदान व सहकार्यामुळे हा विकास शक्य झाला आहे.

कोपरगाव शहर हे विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपला सर्वांचा सहभाग व सहकार्य यापुढे देखील आवश्यक आहे. त्यामुळे मला निश्चितपणे मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे मतदार संघाच्या विकासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तुमचे सहकार्य व मोलाचे योगदान यापुढे देखील द्यावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!