spot_img
spot_img

पीक विमा सर्वर डाउन मुळे शेतकऱ्यांना मनस्ताप !सेतु कार्यालय वालेही हवालदिल

 राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र राज्य सरकारने खरीप हंगामा साठी शेतकऱ्या साठी १ रुपये मध्ये पिकविमा योजना सुरू केलेली आहे परंतु सदरील पीक विम्याचे सर्वर मागील २ दिवसापासून व्यवस्थित चालत नसल्यामुळे शेतकऱ्याना मनस्ताप सहन करावा लागत एका एका शेतकऱ्याच्या पिकाचा विमा उतरवणे साठी २ ते ३ तासाचा कालावधी लागत आहे त्यामुळे सदरील पिकविमा उतरवणारे सेतु चालक सुद्धा मेटा कुटीला आले आहेत

याबाबत सेतु चालक यांना शासनाच्या महा आई टी कंपनी कडून कुठलेही सहकार्य होताना दिसून येत नाही.काल सकाळी ९ वाजेपासून तर रात्री ८ वाजेपर्यंत सर्वर डाउन असल्यामुळे सर्व सेतु कार्यालयवर शेतकऱ्याची तोबा गर्दी झालेली होती परंतु सर्वर डाउन च्या तक्रारीवर कृषि विभाग तसेच शासकीय कंपनी कडून कुठलेही सहकार्य सेतु चालक यांना झालेले दिसून आलेले नाही.

काही ठिकाणी शेतकरी व सेतु चालक यांची बाचाबाची झाल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे तरी याबाबत जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे . 

काल मी माझ्या सोयाबीन चा पिकविमा उतरवणे साठी राहाता  येथील एका सेतु कार्यालय मध्ये सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत बसलो होतो परंतु सर्वर डाउन असल्यामुळे माझ्या शेतीचा पिकविमा भरून झाला नाही शेवटी रात्री ९ वाजता मला माझ्या सोयाबीन चा पिकविमा झाला बाबत पावती मिळाली -अनंत दंडवते -शेतकरी साकुरी
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!