राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा):- आपण सर्वांनी आजपर्यंत अनेक विवाह सोहळे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिले असतील मात्र राहाता शहराच्या इतिहासात प्रथमतः असा विवाह सोहळा स्मशान भूमीमध्ये एकदम थाटामाटा मध्ये अंतर जातीय विवाह सोहळा संपन्न झाला. राहाता शहरातील स्मशान जोगी गंगाधर गायकवाड व पत्नी गंगुबाई गायकवाड यांना तीन मुली व एक मुलगा असून सर्वात लहान कन्या मयुरी हिचा विवाह शिर्डी येथील मनोज जयस्वाल यांच्या सोबत आंतरजातीय पध्दतीने विवाह सोहळा संपन्न झाला.
मयुरी हिचे शिक्षण राहाता येथे बारावीपर्यंत झाले.तर शिर्डी येथील मनोज जयस्वाल याचेही शिक्षण बारावीपर्यंत झालेले असून दोघेही शिर्डी येथील एका ठिकाणी कामास असल्याने त्यांचे मैत्री झाली व पुढे मैत्रीचे प्रेमामध्ये रूपांतर झाले. पुढे जाऊन त्यांनी लग्न करण्याचा विचार केला दोघांच्या घरच्यांनीही लग्नास परवानगी दिली व विवाह सोहळा राहाता शहरात स्मशान भूमीच्या प्रांगणामध्ये थाटामाटा मध्ये संपन्न झाला. आज कालच्या अत्याधुनिक काळात आपल्या प्रिय मुला-मुलींचे लग्न मोठ्या आवाजावी पध्दतीने खर्च करून विवाह सोहळा साजरा केला जातो. परंतु राहाता शहरातील स्मशान जोगी याला अपवाद ठरले आहे.
आपल्या पारंपारिक पद्धतीने विधीपूर्वक विवाह सोहळा यावेळी संपन्न झाला. सन २००३ मध्ये राहाता येथे स्मशान भूमीमध्ये वास्तव्यात आलेले गायकवाड कुटुंब हे शहरांमध्ये स्थायिक झाले
या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे गावभर चर्चा होत होती. या विवाह प्रसंगी शहरातील भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा व त्यांच्या पत्नी ममता भाभी पिपाडा तसेच शहराचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी वधूचे कन्यादान केले यावेळी दशरत तुपे, किरण वाबळे,ॲड. सुनील सोनवणे हे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहाता शहरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळयास उपस्थिती दाखवून माणुसकीचे उदाहरण घालून दिले आहे.



