11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल जिल्हास्तरीय सॉॅफ्टबॉल स्पर्धेत उपविजेते  दर्जेदार शैक्षणिक गुणत्तेबरोबरच सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी

कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहमदगर जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या वतीने शेेवगांव येथे घेण्यात आलेल्या १४ वर्षे वया खालील खेळाडूंच्या सॉफ्टबॉल स्पर्धेत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी इंटरनॅशल स्कूल, शिर्डीच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी उपविजेते पद मिळविले. अल्पावधीत हे स्कूल सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या उपलब्धींचा ठसा उमटत आहे, अषी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

१४ वर्षांखालील मुलींच्या संघात सिध्दी तांबे, राजविका कोल्हे, किमया गोंदकर , कल्याणी लुटे, अनुष्का खरात, जुई पाटील, सुरभी जगताप, रितिका गोंदकर , साची अग्रवाल, स्वरा घोडेराव, भुवी कोठारी, विरा विखे, अदविता पांगे, जिनल पंजाबी व आर्या राय यांचा समावेश होता. तर १४ वर्षांखालील मुलांच्या संघात वल्लभ कोते, आयुष गोंदकर, पार्थ गांगुर्डे, साईराज हाळनोर, सार्थक बाभुळके, ईशान क्षिरसागर, मित कोली, पृथ्वीराज माळवदे, शाश्वत कुमार, साईकृष्णा बोराडे, अर्जुन वडांगळे, हामजा सय्यद, गौरव कदम व श्रीजय बोरावके यांचा समावेश होता.

स्ंजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या डायरेक्टर डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रिन्सिपल डायरेक्टर अशोक जैन, प्राचार्या सुधा सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस माला मोरे यांचेकडून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले तर क्रीडा शिक्षक श्री विरूपक्ष रेड्डी यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!