श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-नुकत्याच नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इ.१२ वी कला शाखेतील विद्यार्थी जोयब शेख याने १९ वयोगटातातून ७२ किलो वजन गटात निवड झाली
असून इंदापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शेख याची निवड झाल्या बद्दल प्राचार्य बाळासाहेब सुर्यवंशी,,शेडगावचे सरपंच विजय शेंडे यांनी अभिनंदन केले आहे.शेख याला क्रिडा शिक्षक वगरे सर,हाके सर नाशिक विभाग ओबीसी शिक्षक नेते प्रा.पांडुरंग भोपळे,प्रा.नितीन झणझणे यांचे मार्गदर्शन लाभले होते.




