spot_img
spot_img

कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे एक लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-   दि. २३/ ०७/ २०२३  रोजी डी वाय एस पी  संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अंमलदार यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आले.
आरोपी. क्र.) 1 शिवाजी संपत माळी, 2) मिथुन छगन माळी रा माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव
 ८४००० /- रु. कि.चे १२००  लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( आंबट उग्र वासाचे किं. अं.)
आरोपी. क्र.) 3. विशाल कृष्णा दळे रा माणकेश्वर नगर, चासनळी ता.कोपरगाव
 ३१५०० /- रु. कि.चे ४५० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
 २००० /- रू किमतीची २०  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)          
 एकूण एक लाख एकवीस हजार पाचशे  रुपये
वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पो. स्टे. येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५  ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
 अचानक केलेल्या या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, डीवायएसपीपी  संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अप्पासाहेब थोरमिसे, पी एन अशोक शिंदे, कॉन्स्टेबल   दिनेश कांबळे, शाम जाधव आदींनी केली.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!