13.4 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरा महोत्सवातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन – मा. सौ. शालिनीताई विखे पाटील

सात्रळ, दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा ):- पद्मश्रींनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून ग्राम जीवनात परिवर्तन घडवून आणले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी समाज जीवनात लोकोपयोगी असे शाश्वत विकासकार्य उभे केले. सन्मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवातून ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि विविधतेत एकता हा संदेश प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवात प्रतिध्वनीत होत असल्याचे मत प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

सात्रळ येथे आयोजित केलेल्या भव्य लकी ड्रॉ सोडत प्रसंगी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थित गणेश भक्तांना मार्गदर्शन केले. त्यापुढे म्हणाल्या, गणेश उत्सवामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. शेती आणि शेतकरी जीवनात आनंद पसरून बळीराजाला सुखी ठेवा, हीच प्रार्थना गणरायाची चरणी करूया. प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवामुळे ग्रामीण समाज जीवनात विशेषतः शाळा-महाविद्यालयीन तरुणाईत नवचैतन्याचे वातावरण पसरलेले आहे. सदर महोत्सवामध्ये नवोदित कलाकारांना व खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून लोकरंजनातून प्रबोधन साध्य करता आले आहे.

प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील, ॲड. श्री. आप्पासाहेब दिघे पाटील, सुभाष जनाजी अंत्रे, जयंत जोर्वेकर, सुभाष नामदेव अंत्रे, रमेश पाटील पन्हाळे, प्रा. बाळासाहेब दिघे, बाबूराव पलघडमल, अशोकराव घोलप, वसंतराव डुक्रे पाटील, श्री. दिलीप डुक्रे पाटील, सौ. मंदाताई डुक्रे पा., श्री. मच्छिंद्र पा. अंत्रे, सात्रळ गावचे सरपंच श्री. सतीशराव ताठे, सोनगावचे सरपंच सुभाष शिंदे, पाथरे गावचे सरपंच श्री. उमेश घोलप, राहता मार्केट कमिटीचे उपसभापती श्री. अण्णासाहेब कडू पाटील, अहमदनगर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री‌ दिनेश आहेर, राहुरी पोलीस स्टेशनचे अंमलदार श्री. जायभाय, मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. नानासाहेब वडीतके, श्री. सिंकदर इनामदार, प्राचार्य प्रा. अर्जुन आहेर, प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव, सात्रळ केंद्राचे मुख्य समन्वय व उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, दैनंदिन आरतीचे मान्यवर यजमान, पंचक्रोशीतील पत्रकार आदी उपस्थित होते. महोत्सवप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. भारत घोगरे पाटील, प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, सौ. लिलावती सरोदे, प्रा. नंदकुमार दळे यांनी सदिच्छा भेट दिली.

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात सोनगाव सात्रळ परिसरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माळेवाडी, आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सात्रळ, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय पाथरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हणमंतगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सात्रळ, श्री रामेश्वर विद्यालय, चणेगाव, संत पॅडेॖ पीओ इंग्लिश मेडियम स्कूल, सात्रळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अनापवाडी, प्रवरा माध्यमिक विद्यालय, झरेकाठी, कॅथोलिक प्राथमिक (सेमी इंग्रजी) व उच्च प्राथमिक शाळा, सात्रळ-सोनगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे, प्रगती माध्यमिक विद्यालय, कानडगाव, श्री संत महिपती विद्यालय, तांभेरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांभेरे, प्रवरा माध्यमिक विद्यालय, रामपूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांदुळनेर अशा एकूण १६ शाळा मधील ६२४ नवोदित कलाकारांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग नोंदविला.

कलाकारांनी लोकरंगभूमीवर सादरीकरणात दाखविलेल्या नाविन्यपूर्ण कलाविष्काराचे सोनगाव सात्रळ पंचक्रोशीतील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, प्रेक्षक व क्रीडाप्रेमींनी यांनी कौतुक केले आहे. याप्रसंगी सहभागी शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व सांस्कृतिक कार्यक्रमाधिकारी, परीक्षक यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आला.

प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव सात्रळ केंद्राचे मुख्य समन्वय व उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!