टाकळीभान,( जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान येथील टाकळीभान विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासदांकडे मोठ्या प्रमाणात कर्जबाकी असल्याने संस्थेच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे ही कर्ज वसुलीसाठी १०१ प्रकरणे करून कारवाई करावी लागणार आहे. तरी सभासदांनी आपल्याकडे असलेली थकीत कर्जबाकी भरून संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, श्रीरामपूर एस पी रूद्राक्ष यांनी केले आहे.
टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान प्राधिकृत अधिकारी एस पी रूद्राक्ष यांचेअध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी एस पी रूद्राक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अहवाल वाचन सचिव रघुनाथ शेळके यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे यांनी अतीवृष्टीचे पैसे शेतकर्यांना मिळालेले नाही. त्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळे वसुली न करता शेतकर्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी कर्जमाफीचा ठराव करण्याची मागणी केली.
यावेळी बोलतांना लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले की, सोसायटीमध्ये असलेले बाहेर गावातील सभासद कमी करावे असा ठराव करावा अशी मागणी केली. त्यास सुनिल बोडखे यांनी अनुमोदन दिले.
माजी उपसरपंच भारत भवार म्हणाले येथील सोसायटी तोट्यात असून इतर गावातील संस्था सक्षम झालेल्या आहेत या सोसायटीमध्ये फक्त राजकारण केले जाते त्यामुळे संस्था वाचविण्यासाठी गट तट विसरून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
संस्थेचे माजी अध्यक्ष राहूल पटारे म्हणाले येथील सोसायटीमध्ये क्षेत्र नावावर नसलेल्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालेला आहे मात्र मी इन्कम टॅक्स भरतो म्हणून कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असे सांगितले आहे तरी याची चौकशी करावी अशी मागणी पटारे यांनी केली. माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले संस्था तोट्यात आलेली आहे त्यामुळे सभासदांनी ओटीएस योजनेचा लाभ घेवून कर्जबाकी भरावी.आपण थकबाकीदार राहिलो तर मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. आपली संस्था टिकली पाहिजे यासाठी कर्जफेड करून संस्था उर्जीत अवस्थेत आणावी असे आवाहन केले.
अण्णासाहेब दाभाडे यांनी दुष्काळ जाहिर करून शेतकर्यांकडे असलेले कर्ज माफ करावे असा ठराव करण्याची मागणी केली.
भास्कर कोकणे यांनी संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे आजारी असल्याने त्यांना संस्थेमार्फत आर्थिक मदतीचा हात मिळावा अशी मागणी केली.
यावेळी जेष्ठनेते ज्ञानदेव साळुंके, मंजाबापू थोरात, दत्तात्रय नाईक, शिवाजीराव शिंदे, राजेंद्र कोकणे, बापूराव त्रिभुवन, एकनाथ लेलकर, मधुकर कोकणे, उपसरपंच कान्हा खंडागळे, भाऊसाहेब मगर, जयकर मगर, राहूल पटारे, भारत भवार, मयुर पटारे, सुनिल बोडखे, संजय रणनवरे, यशवंत रणनवरे, सोमनाथ पाबळे, पाराजी पटारे, अविनाश लोखंडे, भाऊसाहेब पटारे, भाऊसाहेब कोकणे, लक्ष्मण सटाले, प्रसाद भालेराव, दादासाहेब कापसे, एकनाथ पटारे, विलास दाभाडे, मोहन रणनवरे, भास्कर कोकणे, आप्पासाहेब रणनवरे, प्रल्हाद कापसे, भैया पठाण, गोरख कोकणे, बालाजी पटारे, रेवननाथ कोकणे आदी सभासद उपस्थित होते.




