नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- ढोल ताशांच्या गजरात “गणपती बाप्पा मोरया” चा गजर करत नेवासा येथे विघ्नहर्ता गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आले.यावेळी निघालेल्या मिरवणुकीत ९ मंडळांनी सहभाग नोंदवला तर बऱ्याच मंडळांनी मिरवणुकीत सहभाग न घेता प्रवरानदी पात्राच्या कडेला तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन केले. तसेच मधमेश्वर मंदिरापाशी नदीत विसर्जन केले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी गणपती घाटावर असलेल्या गणपती मंदिरात मानाच्या सार्वजनिक गणपती मंडळाची पूजा नगरपंचायतचे कर निर्धारण अधिकारी रामदास म्हस्के व विद्युत कर्मचारी विजय काळे यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने श्रीपाद बडवे, शाम देशपांडे,वसंतराव मोहिते यांच्या हस्ते सर्व उपस्थित सर्व प्रशासन अधिकारी यांचा श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या हस्ते मानाच्या सार्वजनिक गणपती मंडळाने मिरवणुकीस ४.३० वाजता मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी पत्रकार मकरंद देशपांडे ,शंकर नाबदे, मुख्याधिकारी अंबादास गर्कल, मंडलाधिकारी अनिल गव्हाणे कामगार तलाठी आण्णासाहेब दिघे,प्रदिप चव्हाण, कोतवाल बाबासाहेब चौधरी, सुदर्शन बडवे, राजेंद्र मापारी जयंत मापारी विठ्ठल मैदाड उपस्थित होते.
प्रवरा नदी सद्या वहात असल्याने नगरपंचायतच्या वतीने गणपती घाटाच्या नजीक कुत्रीम तलाव निर्माण करण्यात आला होता. घरघरातुन गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी मंदिराबाहेरच लावण्यात आलेल्या टेबलवर गणेश मुर्ती ठेवून आरती केली त्यानंतर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी सर्व गणेश मुर्त्याचे कुत्रीम तलावात विसर्जन केले.
मुख्य रस्त्यावरून निघाल्या मानाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , श्री मोहिनीराज मित्र मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ, जय भोलेनाथ तरुण मंडळ, जय बालाजी तरुण मंडळ, शिव एकता तरुण मंडळ, मित्र परिवार तरुण मंडळ, एकलव्य तरुण मंडळ, त्रिमुर्ती तरुण मंडळ . या मंडळांनी मिरवणुकीत ढोल ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथकाचे सादरीकरण केले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर करत ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला. रात्री १०:४५
वाजण्याच्या सुमारास सर्व गणपतीचे शांततेत व भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली ७ अधिकारी, पोलीस कर्मचारी ३५ ,नवप्रविष्ट कर्मचारी १० गृह रक्षक दलाचे ५५ जवान असा नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत व विसर्जन घाटावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढून श्री गणपती चे विसर्जन केले.