नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सालाबाद प्रमाणे आमदार शंकरराव गडाख युवा मंच व टीम आम्ही नेवासकर आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धा यावर्षी देखील आयोजित करण्यात आली होती. यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने तालुक्यातील असंख्य नागरीकांनी यांनी आपल्या घरातील गणराया पुढे केलेली सजावट आम्ही नेवासकर टीमला पाठवली होती.
या सर्व सहभागी मंडळीतून एकूण 31 सजावटी नियम व अटीप्रमाणे परीक्षण करून स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आल्या होत्या. त्या पैकी सार्थक मयूर जामदार, नेवासा – १२५० मत मिळवत प्रथम स्थान मिळवले, तर विजय रसाळ, नेवासा फाटा – ११२२ मत मिळवत दृतीय स्थान प्राप्त केले, आणि कविता संदीप बडे, सोनई यांनी ७५९ मत मिळवून बनल्या तृतीय बक्षीशाच्या मानकरी ठरला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आ. शंकरराव गडाख यांच्या नेवासा येथील जन संपर्क कार्यालात माजी सभापती सौ. सूनीताताई गडाख यांच्या हस्ते पार पडला.
नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख जनसंपर्क कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी रामभाऊ जगताप,मार्केट कमिटीचे सभापती नंदकुमार पाटील,प्रकाश सोनटक्के लक्ष्मण जगताप, नारायण लोखंडे,शिवा जंगले पाटील, रविंद्र जोशी, सतीश पिंपळे, फारुक आतार, ॲड.काकासाहेब गायके,राजेंद्र चौधरी, पोपट जिरे,राजेंद्र मापारी,दिनेश व्यवहारे,सचिन नागपूरे,रणजित सोनवणे, मच्छिद्र कडू,निलेश जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ.सुनिताताई गडाख म्हणाल्या की समाजात सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आता कालानुरूप अनेक बदल होत असतांना विविध सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला आनंद घ्यायचा आहे,देखावे स्पर्धा हा त्याच्याच एक भाग आहे,एकविचाराने व एकोप्याने कसे रहायचे हे उत्सवातून आपल्याला शिकायचे आहे,एकोपा निर्माण करून विचारांची सांगड आपल्याला घालायची आहे,विचारांनी एकोपा वाढीस लागतो, अशीच नवी दिशा घेऊन आपल्याला नेवासा तालुक्याला एका उत्कर्षाच्या प्रवाहाकडे न्यायचा आहे,समाजाला वर काढण्यासाठी आपल्याला अशा स्पर्धांच्या माध्यमातून पर्याय शोधायचा आहे,समाजाच्या प्रबोधनासाठी विचारांची सांगड घालून पुढे जाण्याचा सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला प्रा. सुनील गर्जे, अभय गुगळे,राहुल देहाडराय,राजेंद्र घोरपडे, विशाल सुरडे, विनायक नळकांडे, जालिंदर गवळी,जयदीप जामदार,विक्की खराडकर, दिलीप जाधव,नरसु लष्करे,ॲड.प्रदीप वाखुरे,ॲड.मयूर वाखुरे, अभिषेक गाडेकर, तुकाराम पवार,भैया कावरे,राजेंद्र सुकाळकर, राजेंद्र लोखंडे, तुषार परभणे,अस्लम मणियार,भाऊसाहेब वाघडकर,राम घोलप,अन्सार बागवान,प्रविण सरोदे यांच्यासह कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.देविदास साळुंके यांनी केले तर आम्ही नेवासकर मिडिया ग्रुपचे सौरभ मुनोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.




