राहाता दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यातील अनेक बाजार समित्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असताना राहाता तालुक्याची बाजार समिती सहा कोटी रुपयांचा ठेवी राखून आहे.शेतकरी हितासाठी कारभार झाला तरच संस्था नावलौकीक प्राप्त करू शकतात.शेती उत्पादित मालाबरोभरच आता फुलांच्या मार्केट करीता वातानुकूलीत सेल हाॅल निर्माण करणार असल्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राज्यात आदर्श व नावलौकिक प्राप्त असलेल्या राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० वी वार्षिक सभेस उपस्थित शेतकरी व्यापारी आडतदार यांना मार्गदर्शन करताना राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते याप्रसंगी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, ॲड रघुनाथ बोठे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, बाबासाहेब डांगे खडकेवाके सरपंच सचिन मुरादे सचिव उद्धव देवकर यांच्या सह सर्व संचालक, सभासद ,व्यापारी व कामगार उपस्थित होते.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की स्वच्छ व पारदर्शी कारभारा व्दारे शेतकऱ्यांचा विश्वास संपादित करणाऱ्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा अव्वल क्रमांक असणाऱ्या राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी वातानुकूलित सेल हाऊस तसेच खत कारखाना व बेंगलोरच्या धर्तीवर अद्यावत फुल मार्केट उभारण्याचा निर्णय करावा यासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
फुल निर्यातीला प्राधान्य देत कांदा डाळिंब व्यवसाय प्रमाणे नावलौकिक प्राप्त करुन नवा आदर्श निर्माण करावा बाजार समितीने आता ऑनलाईन कारभार पद्धतीला प्राधान्य दिले पाहिजे ऑनलाइन प्रक्रियेत शेतकरी बांधवांना देशभरातील बाजार समित्यांची शेतमालाचे भाव निदर्शनास येतात त्यामुळे शेतकरी ज्या ठिकाणी योग्य भाव आहे त्या ठिकाणी आपला शेतमाल देऊ शकतात वास्तविक पंजाब व हरियाणा मधील बाजार समिती दलालांच्या विळख्यात असून दलालच अप्रत्यक्षपणे तेथील बाजार समित्यांचा कारभार हाकतात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान होत असल्याकडे लक्ष वेधून शेतकर्यांचे नूकसान टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचे धोरण व चांगले निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मालाची विक्री शेतकऱ्यांनीच केली पाहिजे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे धोरण शासनाने आणल्यानेच पंजाब हरियाणा मधील ते नेते व दलालांच्या पोटात पोटसूळ उठला होता केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून देशभरातील सुमारे दहा हजार बाजार समित्या ईनाम योजनेद्वारे एकमेकास जोडले आहेत त्यामुळे देशभरातील बाजार समित्यांची भाव व मालाची परिस्थिती आवक जावक याबाबत शेतकऱ्यांना काही क्षणात माहिती मिळते राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीकरणासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची 25 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे या जमिनीत नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेतकरी हिताचे उपक्रम व प्रकल्प उभारले पाहिजे वातानुकूलित फुलांचे सेल हाऊस उभारून राज्यच नव्हे तर देशातील फुलांची निर्यात करणारे केंद्र म्हणून राहत्याला बनवण्याचा प्रयत्न करावा. समृद्धी महामार्ग विमानतळ तसेच रेल्वे यांचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उपयोग कसा होईल या दृष्टीने बाजार समितीने कार्य करणे गरजेचे आहे त्याकरिता गरज भासल्यास देशातील अन्य बाजार समितीचा अभ्यास दौरा करून राहता बाजार समितीत अधिक प्रकल्प व शेतकरी हिताच्या सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचनाही यावेळी त्यांनी बाजार समितीच्या सभापती व संचालकांना दिल्या.
याप्रसंगी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा नाव न घेता चांगलाच खरपूस समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की शेजारच्या तालुक्यातील नेते अनेक वर्ष मंत्री राहून सुद्धा त्यांच्या संगमनेर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा चालू आहे तर कोपरगावात दहा ते पंधरा दिवसाला पिण्याला पाणी मिळते जे स्वतःच्या तालुक्यातील जनतेला वेळेवर पाणी देऊ शकत नाही तसेच आपल्या तालुक्यातील बाजार समित्यांचा अथवा एमआयडीसीचा विकास करू शकत नाहीत त्या नेत्यांनी आपल्या तालुक्यात येऊन विकासाच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही ते आपल्या अंन्नात माती कालवण्याचा व लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रकार करत आहेत राहाता तालुक्यातील जनता याला बळी पडणार नाही असे म्हणाले याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती बापूसाहेब आहेर यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन संचालक संतोष गोरडे यांनी मानले.




