17.8 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘धामोरी खुर्द’ विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मिळणार कै. धोंडीभाऊ सोनवणे यांचे नाव ; सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर..!!

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-  तालुक्यातील धामोरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेच्या कार्यालयात चेअरमन भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये संस्थेला कै. धोंडीभाऊ सोनवणे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.तसेच सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षांमध्ये संस्थेला दोन लाख आडुसष्ट‌ हजार रुपये इतका नफा झाला असून संस्थेच्या सभासदांना ७ टक्के प्रमाणे लाभांश मंजुर करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री.बाबासाहेब सोनवणे, व्हा .चेअरमन अशोक पारखे, संचालक संभाजीनाना कल्हापुरे,संजय हरिश्चंद्रे,राजेश सोनवणे,सुदाम कुसमुडे, विलास सोनवणे,नानासाहेब खेडेकर,अर्जुन गायके,मिराताई कोहकडे ,लक्ष्मीबाई वाडगे, भाऊसाहेब खेडेकर, ॲड. आर के सोनवणे,रामनाथ पांडुरंग सोनवणे , सचिव  संजय शळके सहसचिव देवराम खेडेकर व सभासद उपस्थित होते. शेवटी चेअरमन श्री भाऊसाहेब जाधव यांनी उपस्थित सर्व सभासद व संचालकांचे आभार मानले.

संस्थेच्या ऊत्पन्न वाढविण्यासाठी सहकार खात्याने ठरवुन दिलेल्या १५० ऊद्योगापैकी आपल्याला नव्याने काय करता येईल यावर चर्चा झाली. तसेच थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करण्यावर विशेष भर देण्यात येईल असेही ठरले.”

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!