लोणी दि.३० ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक विद्यालय लोणी यांच्या वतीने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान करण्यात आले. यामध्ये नाटिका ,पोस्टर मेकिंग ,निबंध लेखन स्पर्धा ,जल सुरक्षा अभियान, स्वच्छता जनजागृती पथनाट्य, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वच्छता ही आरोग्य या नाटीकेने विशेष अशी जनजागृती केली .तसेच विद्यार्थ्यांनी मुळा डॅम येथे प्लास्टिक मुक्त अभियान राबवले.तसेच इतरही साफसफाई करून वेगळा आदर्श निर्माण केला.
यावेळी प्रमुख अतिथी सातारा सैनिक स्कूल चे प्राचार्य कॅप्टन के.श्रीनिवासन, विद्यालयाचे कमांडट शेखर जोशी ,प्राचार्य भरत गाढवे तसेच सर्वश्री शिक्षक बाबा बागले, आसने, संजय तांबे, रमेश दळे, सतीश नगरकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.