लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या जलतरपट्टूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून २४ सुवर्णपदक, ७ रौप्य पदक ,५ कांस्यपदक ची लय लूट केली.पद्यश्री विखे पाटील सैनिक स्कुल येथे झालेल्या स्पर्धेत २०० जलतरणपटू सहभागी झाले होते.
या खेळाडूंना विद्यालयाच्या जलतरण प्रशिक्षिका सुचित्रा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांच्या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री श्री .अण्णासाहेब म्हस्के पाटील , प्रवरा शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ , शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे , प्रा.नंदकुमार दळे,क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, माजी प्राचार्या भारती देशमुख, प्रभारी प्राचार्या रेखा रत्नपारखी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी जलतरणपटूंचे अभिनंदन केले आहे.