15.7 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मान्यवर वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि. ०२) महाराष्ट्र बंद केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय संसारे यांनी दिली आहे. या मोर्चास बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा, बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती आदी समविचारी संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.

संसारे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि, गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आर.एस.एस व भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात, शिव-फुले-शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करणा-या आर.एस.एस-भाजप सरकारच्या धोरणाविरोधात, ओबीसींची जातनिहाय जणगणना करणे व संविधानिक हक्क आधिकारांच्या समर्थनात, बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदीर बडव्यांच्या स्वाधीन करण्याच्या आर.एस.एस-भाजपच्या षड्यंत्राच्या विरोधात, बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणा-या देशद्रोही दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणा-या भाजप सरकारच्या विरोधात कायदा व सुव्यवस्था आबादित ठेवत संविधानीक व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र बंद,करण्यात येणार आहेत.

यावेळी जिल्हा महासचिव फ्रान्सिस शेळके, जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोरुंडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा संघटक अनिल सोमवंशी, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष विशाल गायकवाड, शहराध्यक्ष अमोल मोगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!