लोणी दि.३० ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रवरनगर येथे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लोणी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थिनी कु. वेदिका दिघे आणि वैष्णवी पाटील यांनी सादर केलेल्या संशोधन प्रकल्पास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र जाधव यांनी दिली.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डियर ओ फायटम इंडिकम या औषधी वनस्पतीचे गर्भपात क्रिया कलापांचे मूल्यांकन या विषयावर सादरीकरण केले त्यास व्दितीय पारितोषिक मिळाले सदर विद्यार्थ्यांना सहाय्यक प्रा. गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री व संस्थेची विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के पाटील,संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे तांत्रिक व अतांत्रिक संचालक डॉ. प्रदीप दिघे फार्मसी इन्स्टिट्यूशन चे संचालक डॉ. बी. एम. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.