श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक श्री गौरव अरविंद डेंगळे यांची गुश्तिनगिरी महाराष्ट्र असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीरामपूरच्या गौरव डेंगळे नियुक्तीचे पत्र एशियाई असोशिएशनचे सदस्य तसेच भारतीय गुश्तिनगिरी असोशिएशनचे अध्यक्ष योगेश उंटवाल यांनी देऊ केले.गुश्तिनगिरी खेळ हा कुस्ती व ज्युडो या खेळांचे संमिश्रण आहे.तजाकिस्तान राष्ट्राचा हा मुख्य खेळ असून जगभरात अनेक राष्ट्रांमध्ये हा खेळ खेळला जात आहे.भारतात देखील हा खेळ अधिक लोकप्रियकरण्याकरीता,विविध स्पर्धांचे आयोजन करून खेळाडू निर्माण करण्याचे भारतीय गुश्तिनगिरी असोशिएशन मुख्य उद्दिष्ट आहे.श्री डेंगळे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष म्हणून देखील काम करत आहेत.
तसेच विविध क्रीडा संघटनेमध्ये सदस्य म्हणून देखील काम करत आहेत.गुश्तिनगिरी महाराष्ट्र असोसिएशन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे आंतरराष्ट्रीय गुश्तिनगिरी असोशिएशनचे खुरूष,एशियाई असोशिएशनचे सदस्य तसेच भारतीय गुश्तिनगिरी असोशिएशनचे अध्यक्ष योगेश उंटवाल,रवि कपूर,पराग बेडसे, डाॅ अलिम कदीर देशमुख,कोषाध्यक्ष अतुल वाणी, श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,खजिनदार जन्मजय टेकावडे,श्री पार्थ दोशी,श्री राजेंद्र कोहकडे,श्री नितीन बलराज आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.