spot_img
spot_img

संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे – जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ

श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):-सावित्रीबाई फुले संविधान गटाच्या माध्यमातून भव्य संविधान समाज प्रबोधन मेळावा बेलवंडी ( तालुका -श्रीगोंदा ) येथे बहुजन बांधवा आणि भगिनींच्या उपस्थित संपन्न.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरात भव्य संविधान समाज प्रबोधन मेळावा पार पडला.

घटना समितीचे सर्व सदस्य आणि घटना प्रमुख डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिले आहे ते संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे आज भारतीय संविधानाने आपल्याला जे मूलभूत हक्क दिले आहेत त्यामुळे आपण सर्वामध्ये तसेच विशेषत : अल्पसंख्याक समाजात मागील काही वर्षात सकारात्मक असे बदल घडवू शकलो आहेत . अजूनही जे प्रश्न व समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण थेट प्रयत्न करू परंतु आपण अधिकार व हक्क याचबरोबर च प्रतीक आणि आपल्या समाजाप्रती , देशाप्रती असणारे कर्तव्य बजावले पाहिजे, संविधान हे देशाचा आत्मा आहे असे प्रतिपादन आयोजित संविधान मेळाव्यात जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी केले असे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी कुकडी कारखान्याच्या संचालिका प्रणोती जगताप , सी टी सी छाया खताळ, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, श्रीगोंद्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे ,संविधान प्रसारक सुनील ओहोळ, गटविकास अधिकारी राम जगताप , बेलवंडी चे सरपंच ऋषिकेश शेलार , पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , उपसरपंच बाळासाहेब ढवळे, ज्येष्ठ साहित्यिक नामदेव भोसले फासेपारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे आधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान प्रसारक अजित भोसले यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार केशव कातोरे यांनी केले तर आभार अमोल पवार यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!