कोळपेवाडी( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोपरगाव मतदार संघाच्या विकास कामांसाठी करत असलेल्या कामावर प्रभावित होऊन मतदार संघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातत्याने प्रवेश करीत आहेत. आगामी विधानसभा मतदार निवडणुकीत त्यांना साथ देण्यासाठी आंचलगाव येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करत आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आ.आशुतोष काळेंनी दिलेला विकासाचा शब्द पाळत कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात विकासकामांसाठी सर्वात जास्त निधी मिळविला. त्यामुळे आगामी काळात आ.आशुतोष काळे यांना साथ देऊन कोपरगाव तालुका विकासाच्या दृष्टीने अव्वल होण्यासाठी त्यांच्या सोबत येत असल्याचे प्रतिपादन पक्ष प्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी केले.
यामध्ये कालिदास शिंदे, प्रदीप शिंदे, आप्पासाहेब खिरडकर, दादासाहेब जाधव, जब्बारभाई शेख, सबुर शेख, अल्ताफ शेख, अशोक शिंदे, भानुदास शिंदे, नवनाथ शिंदे, भाऊलाल शिंदे, संजय शिंदे, वल्लीम शेख, जैनुद्दीन शेख, रमेश शिंदे, रावसाहेब सुरेश शिंदे, रावसाहेब आप्पा शिंदे, सुरेश मोटे, रमेश एंडाईत, हरिभाऊ शिंदे, योगेश शिंदे, गोपीनाथ ठोंबरे, भीमराज पांडव, मच्छिन्द्र शिंदे, उस्मान शेख, संजय ठोंबरे, आप्पासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव शिंदे, बबन खुरसणे, ज्योती शिंदे यांनी प्रवेश केला.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसणे, माजी संचालक संजय आगवन, चांगदेव आगवन, रायभान रोहम, गौतम बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल महाले, अशोक शिंदे, ग्रामपंचायत सदस्या संगीता शिंदे, किशोर ठोंबरे, रामेश्वर शिंदे, सोमनाथ जोरवर, प्रवीण चांदर, प्रकाश महाले, किरण कुदळे, विलास मोरे, किरण मोरे, सतीश शिंदे, सुखदेव शिंदे, दादासाहेब बनसोडे, अशोक शिंदे, जब्बार शेख, रामभाऊ शिंदे, शिवाजी शिंदे, विठ्ठल पाठक, भाऊसाहेब शिंदे, लक्ष्मण ठोंबरे, दिलीप शिंदे, गोपीनाथ ठोंबरे, भाऊसाहेब येवले, भास्करराव शिंदे, विठ्ठल वाघ, सबूर शेख, मच्छिंद्र शिंदे, वाल्मीक पाठक, प्रकाश गायके, रमेश एंडाईत, गणेश ठोंबरे, दादासाहेब जाधव, नारायण शिंदे, कांतीलाल शिंदे, दशरथ शिंदे, भानुदास शिंदे, नवनाथ शिंदे, रावसाहेब शिंदे, नामदेव शिंदे, निहाल शेख, भाऊलाल शिंदे, भरत शिंदे, एकनाथ गायकवाड, संजय शिंदे, रंगनाथ शिंदे, कालिदास शिंदे, अनिल शिंदे, नितीन शिंदे, दत्तात्रय जाधव, अल्ताफ शेख, पंकज शिंदे, उस्मान शेख, कमउद्दिन शेख, संदीप शिंदे, भारत शिंदे, विशाल शिंदे, सचिन शिंदे, गोकुळ शिंदे, रहेमान शेख, समीर शेख, अहमद शेख, वलीम शेख, सचिन शिंदे, सोमेश्वर वाघ, ज्ञानदेव शिंदे, कुणाल शिंदे, राहुल शिंदे, रमेश शिंदे, रावसाहेब शिंदे, कुणाल नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.