लोणी दि.१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आधुनिक काळातील बदलती जीवनशैली आणि प्राप्त सुख सुविधा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे .बदलती जीवनशैली मानवाच्या मानसिक शारीरिक सामाजिक विकासात घातक ठरत आहे. भौतिक सुखाच्या अधीन होऊन माणूस आपले स्वास्थ्य गमावून बसला आहे आपल्या दिनचर्येस अनुसरून आहार व्यायाम व ध्यानधारणा संतुलित जीवनशैलीचा वापर आरोग्यास उपकारक आहे. बालकांपासून तरुण आबाल वृद्धांपर्यंत हृदय रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नियमित आहार व्यायाम व आरोग्यप्रति जागरूकता महत्त्वाची आहे असे प्रतिपादन डॉ सौमी सिन्हा यांनी केले.
जागतिक हृदयरोग दिनाच्या निमित्त पायरेन्स आय. बी. एम. ए. लोणी आणि प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य जागृती शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमास पायरेन्सचे संचालक डॉ. निलेश बनकर,पायरेन्स आयबीएम चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी,पायरेन्स आय बी एम ए मधील डॉ. मनोजकुमार लंगोटे डॉ. सतीश बिडकर प्रा. प्रमोद बोऱ्हाडे प्रा .सौरभ दिघे प्रा. ऋषिकेश धर्माधिकारी प्रा. योगेश आहेर प्रा. निलेश आवारी प्रा. धनंजय बोऱ्हाडे प्रा. रेणुका तनपुरे प्रा. रणीता वलवे प्रा. पूजा परजणे प्रा. प्रमोद गोपाळे प्रा. प्रशांत गोरडे प्रा. संजय औताडे डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे डॉ. स्वप्नाली बारी डॉ.कविता आहेर, डॉ.अमित विलयते, डॉ.कुलदीप राजपूत डॉ. शोभा तांबे डॉ. अविनाश वाणी आदी उपस्थित होते.
आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्य हीच खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी याबाबत जागरूकता ठेवणे गरजेचे आहे असे डाॅ.बनकर म्हणाले. डॉ. सदफ पटेल, डॉ. आशीर्वाद महाजन, डॉ. संभाजी गुंजाळ यांनी याप्रसंगी हृदयरोग आजार कारणे, लक्षणे, उपचार ,प्रतिबंध ,उपचाराचे व्यवस्थापन यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी याचबरोबर डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल व पायरेन्स आय बी एम ए मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.




