लोणी दि.१( जनता आवाज वृत्तसेवा ):- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशात आज सर्वत्र स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या मोहिमे अंतर्गत लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित, कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुतांकडून तांभेरे गावात स्वच्छता अभियानाचे केले.
तांभेरे येथील श्रीराम मंदिर प्रांगणात झालेल्या या अभियानाप कृषिदुत पवार आदेश , शिंदे नेताजी , नांद्रे सुशांत , ढमढेरे दिग्विजय , हांगे हर्षद यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
या प्रसंगी श्री संत महिपती महाराज विद्यालय तांभेरे येथील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते याप्रमाणे तांभेरे गावातील सरपंच सुधाकर मुसमाडे ,श्रीराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन मुसमाडे ,सचिव दीपक मुसमाडे , सुनिल गागरे ,सचिन कोते ,माजी सैनिक ताराचंद गागरे इ मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कृषी संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा.रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ.दिपाली तांबे. डॉ विक्रम अनाप यांनी या कृषिदुतांना मार्गदर्शन केले.




