बेलापुर (जनता आवाज वृत्तसेवा):-बेलापुर ग्रामपंचायतीने नादुरुस्त झालेले सी सी टी व्ही कँमेरे तातडीने दुरुस्त केले असुन सर्व सी सी टी व्ही चा आढावा श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी पत्रकार यांच्या समवेत घेतला तसेच काही सुचनाही दिल्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने बेलापुरच्या मुख्य चौकात तसेच बायपास व गावात येणाऱ्या रस्त्यावर सी सी टी व्ही कँमेरे बसविले होते व त्याचा कंट्रोल बेलापुर पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला होता काही महीन्यापासून हे कँमेरे बंद होते कारखान्याकडे ऊस घेवून जाणाऱ्या ट्रकमुळे केबल तुटून सी सी टी व्ही चे बारा कँमेरे बंद पडले होते.
बेलापुर गाव सी सी टी व्ही च्या निगराणीखाली बंद पडलेले कँमेरे झाले दुरुस्त
मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व्यापारी, बँका, पतसंस्था ,मेडीकल दुकाने यांनी आपल्या सोयीनुसार दुकानात, पतसंस्थेत कँमेरे बसवुन एक कँमेरा रस्त्यावरील चित्रण होईल अशा पद्धतीने लावण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक गवळी यांनी नुकत्याच घेतलेल्या व्यापाऱ्याच्या बैठकीत दिल्या होत्या. त्याच बरोबर ग्रामपंचायतीचे बंद असलेले कँमेरे त्वरीत सुरु करावेत अशा सुचनाही देण्यात आलेल्या होत्या.
ग्रामस्थांनीही कँमेरे सुरु करण्यात यावेत अशी मागणी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्याकडे केली होती या मागणीची तातडीने दखल घेवुन बंद असलेले सर्व कँमेरे पूर्ववत सुरु केले असुन त्या कँमेऱ्यांची पहाणी ग्रामपंचायत पदाधिकारी, पत्रकार यांच्या समवेत पोलीस निरीक्षक गवळी यांनी केली .
या वेळी म जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,हाजी ईस्माईल शेख अजीज शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले,जीना शेख,सहाय्यक फौजदार सुधीर हापसे पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हरिष पानसंबळ संपत बढेनंदु लोखंडे भारत तमनर उपस्थित होते



