राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-केलवड खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन श्री सुनील दामोदर गमे यांनी भूषविले.
सदर प्रसंगी मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री व खासदार डॉ.सुजय दादा विखे पाटील यांचे केलवड येथे सौर ऊर्जा प्रकल्प तसेच शिर्डी येथे नवीन एमआयडीसी आणल्याबद्दल व शिर्डी मतदारसंघातील पन्नास हजार पेक्षा जास्त महिलांना अधिक मासानिमित्त तीर्थक्षेत्राचे दर्शन घडवून आणल्याबद्दल अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
तसेच महाराष्ट्र शासनाने ने खरीप हंगाम 2023- 24 हा पूर्णपणे वाया गेल्या कारणाने दुष्काळ जाहीर करावा तसेच विमा कंपन्यांनी शेतकरी सभासदांना त्वरित विमा द्यावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली संस्थेचे चेअरमन श्री सुनील गमे व्हा.चेअरमन श्री संदीप बढे यांनी संस्थेच्या सर्व सभासदांचा पाच वर्षाकरिता अपघात विमा उतरविणार असे सभेमध्ये जाहीर केले. तसेच संस्था सभासदांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले या प्रसंगी संस्थेचे जेष्ठ सभासद सुभाषराव गमे पा तबाजी घोरपडे पा. श्री पी डी गमे,काळु राजपूत,भारत राऊत संचालक लक्ष्मण ठोंबरे,चंद्रकांत गमे, सुभाष गोरडे,सचिन राऊत, अनिता गोरडे,कुसुम घोरपडे,नवनाथ वाघे, शिवराम राऊत,अवडाजी रजपूत, राजेंद्र गोरडे, हरिभाऊ गायकवाड, भागवत गमे, बाबासाहेब कांदळकर, दत्ता गोरडे, सुभाष वाघे,संदीप गमे आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक मंडळ सभासद सचिव सुनील गमे यांनी अहवाल वाचन केले. सभेचे सूत्रसंचालन श्रीनिवास घोरपडे यांनी केले.




