लोणी दि.२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कृषि क्षेञात मोठी करीअर संधी आहे.शेतक-यांनी केवळ उत्पादन न घेतला प्रक्तिया आणि मार्केटींग करण्याबरोबरचं आत्मर्भर होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन कृषि जैवतंञज्ञान महाविद्यालयाचे डाॅ.रमेश जाधव यांनी केले.
लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय लोणी अंतर्गत गोगलगाव येथे शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.यावेळी डाॅ.जाधव बोलत होते.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे शास्ञज्ञ शांताराम सोनवणे,कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे,डाॅ.रमेश खेडकर,योगेश बैरागी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी, महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा. परिमल विखे, प्रा. मनीषा अधिक प्रा.सारिका पुलाटे, डॉ.अमोल सावंत तसेच गोगलगाव चे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.रमेश खेडकर यांनी गाईचे वांजपण निवारण व दुध वाढीसाठी चारा नियोजन याविषयावर,शांताराम सोनवणे यांनी रब्बी हंगामातील पीक नियोजन या विषयावर, तसेच डाॅ.योगेश बैरागी यांनी एमपीएससी परीक्षेविषयी शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकांत डॉ.शुभांगी साळोखे यांनी शेतकरी आणि विद्यार्थी यांना मशरूम प्रक्रिया, उती संवर्धन, हायड्रोपोनिक्स,अझोला प्रक्रियेची माहिती दिली.
सदर कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले, यावेळी सूत्र संचालन प्रांजल कावळे हिने केले तर आभार प्रा.भाऊसाहेब घोरपडे यांनी केले.



