spot_img
spot_img

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज लोणी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

लोणी दि.२( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लोणी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाल्याची माहीती प्राचार्या सौ.रेखारत्नपारखी यांनी दिली.

यावेळी सौ. सुनीता विखे, प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ .अनिता घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुनीता विखे यांनी विद्यार्थिनींना लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याची ओळख करून दिली तर विद्यालयाच्या शिक्षिका सौ. निर्मळ जयश्री यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन व त्यांची जीवन तत्वे याची माहिती विद्यार्थिनींना दिली. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक व गांधीजी यांच्या विषयी आपले मनोगत भाषण व कवितेच्या माध्यमातून व्यक्त केले.

याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तसेच , विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी”ग्राम स्वच्छता अभियान” कार्यक्रम लोणी बुद्रुक सरपंच सौ. कल्पनाताई मैड , ग्राम विकास अधिकारी संतोष ठिगळे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पार पाडला . ग्रामपंचायत परिसर येथे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी परिसर स्वच्छता करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!