म्हैसगाव( जनता आवाज वृत्तसेवा ) : – म्हैसगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात चेअरमन दत्तु गागरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . याच सभेत सन २०२२ – २३ च्या नफा वाटणीतुन सभासदांना उंच्चाकी १५ % लाभाश देण्याचा निर्णय घेण्यात आला .
या सभेत दिवगंत झालेले सभासद थोर व्यक्तीना तसेच दोन दिवसापुर्वी बेलकरवाडी येथील मृत पावलेले जवान ज्ञानेश्वर ढवळे यांना मौन राखुन श्रध्दांजली वाहण्यात आली . सभेत सभासद चांगदेव चोपडे , सखाहरी काकडे , धनंजय गागरे व मारुती गागरे यांनी उपस्थीत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला . सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन गागरे यांनी समर्पक उत्तर दिले . सभेपुढे ठेवलेले सर्व विषय मंजुर करण्यात आले . यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन ज्ञानदेव माने संचालक बाबासाहेब हुलुळे , विलास गागरे , नानासाहेब देशमुख , जनार्धन विधाटे, दादासाहेब दाते , सवित्रा गुलदगड , नानासाहेब गागरे , जगननाथ मुसळे ,सुनिता हुलुळे , ताराबाई आग्रे ,भास्कर गागरे तंटामुक्तीचे अध्यक्ष गहीनीनाथ हुलुळे जेष्ठ संचालक बापुसाहेब गागरे , भानुदास गागरे , सखाहरी आग्रे , खंडेराव देशमुख सचिव भागवत तनपुरे व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .



