spot_img
spot_img

माजी आ.भानुदास मुरकुटेंसह पदाधिकारी व कार्यकर्ते तेलंगणा भेटीला

श्रीरामपूर( जनता आवाज
वृत्तसेवा ):-माजी आ.भानुदास मुरकुटे यांचेसह अशोक कारखाना, अशोक बँकेचे संचालक व कार्यकर्ते तेलंगणाच्या अभ्यास दौ-यासाठी काल रवाना झाले.या दौऱ्यात सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे जगविख्यात उपसा सिंचन योजनेसह तेलंगणातील शेतक-यांसाठीच्या योजनांची माहिती घेणार आहेत. माजी आ.मुरकुटे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या ११६ जणांचे शिष्टमंडळ या अभ्यास दौऱ्यासाठी गेले आहेत. 
यात अशोक बँकेचे चेअरमन अॕड.सुभाष चौधरी,अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे,लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ,संचालक भाऊसाहेब उंडे, विरेश गलांडे,ज्ञानेश्वर काळे, रामभाऊ कसार, माजी चेअरमन ज्ञानदेव सळुंके,दिगंबर शिंदे, आदिनाथ झुराळे,बाबासाहेब आदिक, अच्युत बडाख,अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर बनसोडे आदिंसह कार्यकर्ते यांचा समावेश आहे. या अभ्यास दौऱ्यात जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेची पाहाणी करणार आहेत.तसेच तेलंगणा सरकार शेतक-यांसाठी राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचीही माहिती घेणार आहेत. 
काही दिवसापूर्वी माजी.आमदार भानुदास मुरकुटे साहेब हे एकटेच तेलंगण दौऱ्यावर गेले होते त्या वेळी त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (के सी आर) यांची ही भेट घेतलेली चर्चा आहे आणि परत काही दिवस जात नाही तर पुन्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यान सह
तेलंगणा मध्ये दाखल झाले आहे हे फक्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नेमके अभ्यास दौऱ्यावर गेले आहे की या मागे माजी.आमदार मुरकुटे यांची काही नवीन राजकीय खेळी आहे की अजून काही अशी चर्चा श्रीरामपूर मध्ये जोरात सुरु आहे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!