spot_img
spot_img

गडचिरोली येथे होणाऱ्या ४२व्या राज्यस्तरीय सबज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी कु.साईश गोकुळ कदम याची निवड.. विविध मान्यवरांनी केले कु.साईश याचे अभिनंदन..!

म्हैसगांव ( जनता आवाज वृत्तसेवा ):-दि.२१ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर येथील सी.डी.जैन कॉलेज मैदानावर ४२ व्या राज्यस्तरीय सबज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेच्या राज्यस्तरीय संघ निवडीसाठी पात्रता सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत म्हैसगाव येथील केदारेश्वर माध्यमिक विद्यालयातील इ.८वीचा विद्यार्थी व म्हैसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळ कदम यांचा मुलगा कु.साईश गोकुळ कदम याने बॉल बॅडमिंटनच्या पात्रता स्पर्धेत चमकदार कामगिरी करत विजय संपादन केला आहे. या विजयाच्या जोरावर कु.साईश कदम याची ५ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान गडचिरोली येथे होणाऱ्या ४२ व्या राज्यस्तरीय सबज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कु.साईश हा म्हैसगाव सारख्या अतिशय दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थी असून देखील बॉल बॅडमिंटन सारख्या आधुनिक खेळात त्याने विशेष कौशल्य प्राप्त केल्यामुळे त्याच्या खेळाचे व त्याचे विविध मान्यवरांनी कौतूक आणी अभिनंदन केले .राहुरी तालुक्याचे आमदार मा.मंत्री प्राजक्त तनपुरे तसेच सौ. उषाताई तनपुरे, शिवसेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी कु.साईश याचा सत्कार करत.पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कु.साईशला केदारेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मुसळे सर, क्रिडा शिक्षक श्री.गागरे सर क्रीडा शिक्षक जाधव सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन केले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!