spot_img
spot_img

आदर्श नागरी पतसंस्थेची सभा खेळीमेळीत पार आणि १२ टक्के लाभांश वाटण्याचा निर्णय.

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा): – राहुरी तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या  अग्रेसर असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत गीते होते. 

यावेळी सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले .संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी सांगितले की, पतसंस्थेवर ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासदांचा खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत सुमारे ७३ कोटी ठेवींचा टप्पा संस्थेने गाठला आहे. सर्वसामान्य माणूस, सामान्य सभासद व व्यावसायिकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करीत आहोत. सभासदांना यावर्षी १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संस्थेचे सर्व व्यवहार सहकार खात्याच्या नियमानुसार करून सभासद खातेदारांना व्यवहाराच्या उत्तम सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यात आम्हाला सर्व संचालक मंडळ, सभासद, कामगार व कलेक्शन एजंट यांचे सहकार्य लाभले आहे. यापुढे सर्वांचे असेच सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा चेअरमन विष्णूपंत गीते यांनी व्यक्त केली.

या संस्थेच्या थकबाकीदार सभासदांनी आपले कर्ज वेळेवर भरून संस्थेत सहकार्य करावे व कारवाई टाळावी, असे आवाहन यावेळी व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज यांनी केले.व्यवस्थापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अह- वाल वाचन केले. सभेस संचालक अण्णासाहेब चोथे, अविनाश साबरे, सुधाकर कदम, मारो- तराव खरात, दत्तात्रय रोडे, भारत चोथे, पल्लवी सोनी, कमलताई काळे, राहुरी अर्बनचे रामचंद्र काळे, साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्ष संगीता कपाळे, राहुरी अर्बनच्या संचालिका उमाताई गीते, अन्सार शेख आदींसह सभासद, कर्मचारी, कलेक्शन एजंट उपस्थित होते. आभार प्रकाश सोनी यांनी मानले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!