spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे- पो. नि. धनंजय जाधव.

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):- विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर रहावे असे प्रतिपादन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठच्या वतीने घेण्यात आलेल्या, समुपदेशन तरुणाईचे, उद्याच्या उज्वल भारताचे, या कार्यक्रम प्रसंगी धनंजय जाधव यांनी प्रतिपादन केले .

ते म्हणाले कि मित्र मिळवताना सोशल मीडियाच्या जाळ्यात न अडकता आपल्या घरातील आई वडील , भाऊ ,बहीण व ओळखीच्या जवळच्या व्यक्ती बरोबर मैत्री करावी . यापेक्षा उत्तम मित्र कोणीच नाही. मुलींच्या आपत्कालीन संकट प्रसंगी, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा ११२ चा उपयोग करावा, याद्वारे दामिनी, निर्भया सारखी पोलीस पथक आपणाल लगेच मदत करतील. किशोरवयीन मुला-मुलींनी बाहय आकर्षणाला बळी न पडता आपले ध्येय निश्चित करून,ते साध्य करण्याकरिता कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. चांगले मित्र-मैत्रिणी असतील तर आपली जडणघडण सकारात्मक होते .प्रसारमाध्यमाच्या अनेक आकर्षणाला बळी न पडता मुलींनी सजग राहावे .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ महानंद माने होते. विद्यार्थ्यांनी शिल ,सदाचार प्रामाणिक पणा हे गुण जोपासत उत्तम नागरिक बनावे . मनावर नियंत्रण ठेवण्याकरिता आनापान मित्र उपक्रमचा सतत फायदा होतो ,हे सांगितले

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे , उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे , पर्यवेक्षक मनोज बावा,इंग्लिश मीडियमचे प्राचार्य योगिता आठरे , संतोष जाधव , घनश्याम सानप, सुरेखा आढाव सर्व शिक्षकउपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .जितेंद्र मेटकर यांनी केले सूत्रसंचालन सुरेखा आढाव यांनी केले तर आभार प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी केले यावेळी राष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!