राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता येथे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टी ब्रँड टू व्हीलर ची सेवा देण्याच्या स्पीड फोर्स कंपनीचा साई मंगल ऑटो चा शुभारंभ नुकताच महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या शुभहस्ते व अ नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी डॉ दत्ता कानडे,डॉ नितीन आहेर,सुभाषराव गमे,एस टी निर्मळ,श्री भाटीया साहेब,सूर्यकांत निर्मळ,डॉ स्वाधीन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
साई मंगल ऑटोच्या माध्यमातून ग्राहकांसाठी दुचाकी सर्विस स्पेअर्स,ओईल,बॅटरी एक्सीडेंट,पोर्ट ,ब्रेक डाऊन सर्विस,इन्शुरन्स,रोड साईड एक्सीडेंट व सर्विस सर्व सेवा या अत्याधुनिक पद्धतीने व कुशल करागिरा मार्फत एकाच ठिकाणी माफक दरात देण्यात येणार असल्याची माहिती संचालक महेश वाघे यांनी दिली.
याप्रसंगी बोलताना महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी तरुणांनी नवनवीन उद्योग व्यवसाय करण्याचे सुचवताना ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
तसेच साई मंगल ऑटोला शुभेच्छा देत परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी साई मंगल ऑटो ला शुभेछा देताना प्रत्येक व्यवसायात तंत्रज्ञान, आत्याधूनिकतेची कास धरत ग्राहकाचे हित प्रामाणिकपणा व सचोटी हे गुण महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
ग्रामीण भागात सर्वप्रथम आधुनिक यंत्रसामुग्री व कुशल कारागीर असलेले टू व्हीलर सेवा देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी सेवा सुरू झाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी ज्ञानदेव घोरपडे, जालिंदर निर्मळ, कैलास घोरपडे, किशोर डाके,रंजीत हाडे, अशोक क्षीरसागर,डॉ अमोल पोकळे,डॉ गोकुळदास शिंदे,विक्रम राजोळे,धनराज निधाने, साई मंगल आटो चे सर्व कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



