spot_img
spot_img

जलजीवन’च्या टाक्या रद्द का झाल्या ? – प्राजक्त तनपुरे करंजीत आढावा बैठक 

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) : – मंजूर टाक्या रद्द करून जलजीवन मिशन कसे पूर्ण होईल, या टाक्या रद्द झाल्याच कशा ? असा संतप्त सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना केला. 

करंजी येथे जलजीवन योजनेच्या कामाच्या आढावा बैठक आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी करंजीचे सरपंच नवनाथ आरोळे, मिरी गावचे सरपंच राहुल गवळी, भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, शिराळ गावचे सरपंच पिनू मुळे सातवड गावचे सरपंच राजेंद्र पाठक, मिर्झाजी मण्यार, जालिंदर वामन, राजेंद्र म्हस्के उपस्थित होते.बैठकीत राजेंद्र पाठक यांनी सातवडमध्ये टाकीचे सुरु झालेले काम बंद केले असल्याचे सांगितले. अनेक सरपंचांनी त्यांच्या गावात मंजूर झालेल्या तथा काम सुरू झालेल्या टाक्या रद्द झाल्याचे प्रशासनाने प्राजक्त तनपुरे लागणार पत्र दिल्याचे सांगितले.

अनेक ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे असल्याचे तनपुरे यांचे निदर्शनास आणून दिले. यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वर्कऑर्डर निघालेली असताना दुष्काळी भागातील सहा गावच्या सहा टाक्या रद्द झाल्याच कशा, असा संतप्त सवाल केला. ज्या ठिकाणी पाणी चोरी होते, त्या ठिकाणी पाईप जमिनी खालून न घेता ते जमिनीवरून घ्यावेत, जेणेकरून पाणीचोरीला आळा बसेल तसेच अनेक ठिकाणी वाडी वस्तीवर हर घर जलचा सर्व्हे झाला नाही. त्यामुळे अनेक कुटुंब पाण्यापासून वंचित राहितात. त्यामुळे त्याचाही सव्हें आगामी बैठकीत तातडीने करून आणावा अशा सूचनाही तनपुरे यांनी आढावा बैठकीमध्ये केल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!