spot_img
spot_img

चिचोलीच्या महिला औषधनिर्माणशास्ञ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना मार्फत आरोग्य शिबीर

लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-महिला महिला औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय चिंचोली येथे राष्ट्रीय सेवा योजना दिवस व औषध निर्माण शास्त्र शास्त्र दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चारूशीला भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाने ब्राह्मणवाडा येथे मोफत औषधोपचार आरोग्य तपासणी शिबिर घेतले या शिबिरात लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत आरोग्य तपासणी करून त्यांना आजारावर मोफत औषधे देण्यात आले. यासाठी सिन्नर केमिस्ट असोसिएशन माजी अध्यक्ष लखमाजी लहाने यांच्या तर्फे मोफत औषधे पुरविण्यात आली. या शिबिरास गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी तसेच गावातील इतर लोकांची तपासणी करण्यात आली. या शिबिरायासाठी सुखदेव गिते, पोपट माळी, शांताराम माळी, संदीप गिते, चंद्रभागा कच्चे, ईश्वर वाघ, विलास गिते, कैलास गिते, मतीसुमन गिते, सुमन गिते, शितल गिते, आदींचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. कावेरी वडीतके,प्रा.शितल गोसावी, प्रा बाळू जगताप व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!