spot_img
spot_img

कारखाना व्यवस्थापन व शेतकर्‍यांमधील संवाद प्रक्रियेसाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने विकसीत केले ‘प्रवरा किसान’ ॲप

लोणी दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-कारखाना व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्यातील संवाद प्रक्रीयेसाठी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याने प्रवरा किसान ॲप  विकसित केले असून ऊसाच्या नोंदणीपासून ते गाळपासाठी आलेल्या ऊसाच्या वजनाची बिलींगसह माहीती शेतकऱ्यांना सहज उपलब्द होणार आहे.यापुर्वी ऊसाच्या वजनाची माहीती शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे देण्याची पध्दतही फक्त विखे पाटील कारखान्यात सर्वात प्रथम सुरू केली होती.खा.डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ३२ हजार शेतकऱ्यांना या ॲपची लिंक पाठविण्यात आली आहे.

आज सर्वच क्षेत्रातील व्यवस्था डिजीटल स्वरूपात उपलबध्द झाल्या आहेत.आता सहकार क्षेत्र सुध्दा मागे राहीलेले नाही.यामध्ये पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.कारखान्याचे मार्गदर्शक ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारने विकासित झालेले प्रवरा किसान ॲप  ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेलच परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना सर्व माहीती सहज मिळणार असल्याने पारदर्शी कार्यपध्दती सुध्दा पाहायला मिळणार आहे.

कारखान्याचा आय टी विभागाच्या वतीने विकासित करण्यात आलेल्या प्रवरा किसान ॲप  मध्ये शेतकरी चालू हंगामात आपल्या ऊसाचे कितमिळते.त्र नोंदले गेले तसेच नोंदवलेल्या ऊसाच्या क्षेत्राची सॅटेलाईट इमेजही शेतकरी सहजपणे पाहू शकणार आहेत.

तोडलेल्या ऊसाचे वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांना वजनाचा मेसेज अवघ्या दोन सेकंदात पोहचणार आहे.त्याची स्लिप आणि ऊसाच्या बीलाची स्लिप शेतकऱ्यांना घरबसल्या आता पाहायला मिळणार असल्याने गावापासून ते कारखाना कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचविण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापनाने केल्याचे पाहायला मिळते.

ऊसाच्या लागवडी बाबत तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेती संदर्भातील काही मार्गदर्शक सूचना करायच्या असतील तरी एका संदेशाद्वारे शेतकऱ्यां पर्यत पोहचवणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले.याबरोबरच शेतकरीही आपल्या काही सूचना तसेच समस्या या ॲपद्वारे कारखान्याच्या व्यवस्थापना पर्यत पाठवू शकतील आशा पध्दतीने हे ॲप  विकसित करण्यात आले असल्याचे विभागप्रमुख योगेश वर्पे यांनी सांगितले.

डॉ विखे पाटील कारखान्याने आपल्या व्यवस्थापनात सातत्याने आधुनिकता आणली आहे.माहीती तंत्रज्ञानाचा उपयोग करून सभासद व व्यवस्थापन यांच्यात कामाची सुसूत्रता आणण्यास मोठी मदत होईल.यापुर्वी सुध्दा फक्त विखे पाटील कारखान्यानेच  गाळपासाठी आलेल्या ऊसाच्या वजनाचा मेसेज पाठविण्याची सुविधा निर्माण केली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!