लोणी दि.३ ( जनता आवाज वृत्तसेवा):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून लोणी येथील पद्यश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सैनिक विद्यालयाच्या वतीने गोगलगाव येथे स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. तसेच एक तास श्रमदान ही करण्यात आले.विद्यार्थ्यांनी या प्रसंगी घरोघरी जाऊन स्वछतेचे महत्त्व पटून देत गावातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हे ही पथनाटीकेतून पटून दिले.
या प्रसंगी गोगलगाव येथील ग्रामस्थ माधव पडवळ, सरपंच भाऊसाहेब खाडे, उपसरपंच गंगाधर चौधरी सदस्य सुरेश ठोके,मारुती ठोके,प्रभाकर मगर, अनिल चौधरी,मच्छिंद्र गायकर,नाना गायकर,नामदेव पांढरकर, सुदाम अनारसे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या बालमनावर होणारे हे संस्कार खरोखरच खूप महत्त्वाचे असून देशविकासाच्या कामासाठी ते निश्चितच उपयोगी पडतील.आजचे बालक हे उद्याचे पालक असे गौरोद्गार या प्रसंगी माधव पडवळ यांनी काढले. विद्यार्थ्यानी गावात राबविलेले हे अभियान नक्कीच गावासाठी प्रेरणादायी ठरेल असे सरपंच भाऊसाहेब खाडे यांनी सांगितले.या कामी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कमांडंट शेखर जोशी, प्राचार्य भरत गाढवे, अभियानाचे समन्वयक सतीश नगरकर,सौ वैशाली नगरकर,आदी मार्गदर्शन केले.



