spot_img
spot_img

डॉ. अनुश्री खैरे यांची होम सायन्सच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निवड

लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.अनुश्री राजेंद्र खैरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंञज्ञान शाखेअंतर्गत होम सायन्स च्या तदर्थ अभ्यासमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 
 विविध उपक्रमशील असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची ही निवड महाविद्यालयाच्या आणि संस्थेच्या दृष्टीने अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे. 
  
डॉ. खैरे यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मा. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमात विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह संस्थेचे अतिरिक्त संचालक डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे यांच्यासह सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी डॉ. खैरे यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!