राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्री क्षेत्र ताहाराबाद येथील श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानच्या मठाधिपतीपदी महंत अर्जुन महाराज तनपुरे यांची निवड झाल्याबद्दल रणरागिनी महिला मंडळाचे अध्यक्षा धनश्री ताई विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर देवस्थानचे दुसरे महाराज नामदेव महाराज शास्त्री यांचाही सन्मान करण्यात आला.
हभप तनपुरे महाराजांमुळे संत महिपतींचा महिमा वाढेल:धनश्री ताई विखे पाटील. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान च्या मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांची निवड झाल्याबद्दल विखे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार
यावेळी धनश्रीताई विखे म्हणाल्या, संत महिपती देवस्थानाच्या प्रचार व प्रसार अर्जुन महाराजांमुळे होईल. जागतिक पातळीवर संत महिपतीचा महिमा वाढेल. प्रत्येकाला महिपतीची महंती कळेल व जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून संत महिपती देवस्थान उदयाला येईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विखे कुटुंब सदैव राजकारणाबरोबर समाजकारणात व धार्मिक कार्यात आहे. संत महिपती च्या सर्वांगीण विकासासाठी विखे कुटुंब सदैव प्रयत्नशील असून लवकरात लवकर दुसऱ्या सभा मंडपाचे भूमिपूजन ( 25.80 लक्ष रुपये ) करण्यात येऊन एक महिन्यात सभा मंडपाचा लोकर्पण सोहळा करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यासाठी पुढील आठवड्यात भूमिपूजन सोहळा होणार आहे. तसेच देवस्थान ‘क ‘वर्गात असून ‘ब ‘वर्गात समाविष्ट करण्यासाठी देवस्थान समितीला प्रस्ताव दाखल करावा त्यासाठी अधिकारी वर्गाच्या बैठक बोलावली आहे.



