17 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गैरव्यवहार संचालक ज्ञानेश्वर जगताप यांची पणन मंडळाकडे तक्रार 

वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ): –कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाबाबत बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी पणन संचालकाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. बाजार समितीचे निवृत्त सचिवासह रोजंदारीवर कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च होत असून या खर्चाची कुठलीही नोंद बाजार समितीच्या लेख्यामध्ये दिसत नाही.

निवृत्त सचिवाच्या पगारासाठी व्यापाऱ्यांकडुन फीस म्हणून परस्पर दहा लाख रुपये वसूल करून सचिवांना पगार दिला. बाजार समितीने कामासाठी रोजंदारीवर मुले ठेवले असून त्यावर प्रति महिना दोन लाख रुपये खर्च आहे. असा आरोप आजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी पणन संचालक यांना दिलेल्या अर्जात केला आहे. बाजार समितीचे सभापती व सचिव यांचा मनमानी कारभार थांबवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

येत्या आठ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास सीबीआयकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बाजार समितीच्या मासिक बैठकीत उपसभापती शिवकन्या पवार या गैरहजर होत्या. असे असतांना त्यांचे पती मधुकर पवार हे उपसभापतींच्या खुर्चीमध्ये बसुन बाजार समितीचा कारभार हाताळत असल्याची धक्कादाय बाब समोर आल्याचे जगताप यांनी तक्रारीत म्हंटले आहे. ते राजरोसपणे बैठकीत बसुन कामकाज हाताळुन खोट्या सह्या करतात असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!