spot_img
spot_img

पायरेन्स आय बी एम ए मध्ये स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम

लोणी दि.५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मप्रित्यर्थ पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले राज्यातील अनेक भागांमध्ये शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था यांद्वारे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते याद्वारे सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली.

यामध्ये मग बस स्थानके, रेल्वे स्टेशन, पर्यटन स्थळे, उद्यान अभयारण्य,सार्वजनिक परिसर या ठिकाणच्या ग्रामीण व शहरी भागातील स्वच्छतेचे काम करण्यात आले स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत एक तारीख एक घंटा या उपक्रमाद्वारे स्वच्छतेसाठी पायरेन्स आयबीएमएमध्ये श्रमदान करण्यात आले. कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्याद्वारे सामूहिक सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी पायरेन्स संचालक डॉ. निलेश बनकर यांनी कचरा मुक्त भारत मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी हातभार लावला पाहिजे. कचरा मुक्त भारत मोहिमेचा मुख्य उद्देश स्वच्छता आणि सुरक्षितता हा होय आपला परिसर स्वच्छ व सुंदर हरित कसा राहील याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे त्याकरता आठवड्यातून एक दिवस श्रमदान करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!