कोपरगांव( जनता आवाज
वृत्तसेवा ):- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेवुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेच्या कॉम्प्युटर, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या तब्बल ४३ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. यातील चार अभियंत्यांना रू७ लाखांचे तर उर्वरित अभियंत्यांना रू ३. ३६ लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे, अषा प्रकारे संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण युवक युवती नोकरदार बनताहेत, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की टाटा समुहाची टीसीएस ही बहुराष्ट्रीय कंपनी असुन ४६ देशात कार्यरत आहे. या कंपनीने यश पवार, लतिकाबेन नागपुरे, वैष्णवी महाजन व शुभम मांगलेकर यांची रू ७ लाख वार्षिक पॅकेजवर निवड केली आहे.तर मयुरी भड, संकेत सातपुते, जयदिप निकम, सोहम सोमवंशी, अजिंक्य जाधव, श्वेतार्क कदम, सोहम क्षिरसागर, अक्षदा दुशिंग, आकाश देव्हारे, प्रशांत ढगे, करण आढाव, गौरव जाधव, विशाल कदम, साहिल शेख, दिपक कुंभारकर, प्रथमेश खैरे, सलमान पठाण, राम निमसे, अथर्व सोनवणे, ज्ञानेश्वरी काळे, श्रेयश लोहकणे, देवाशिष पाठक, आदित्य महाले, श्रध्दा दहातोंडे, प्रसाद चौधरी, प्रज्वल नालकर, वैभव आंधळे, आकांक्षा दानवे, नागेश गर्जे, निखिल कासार, श्रेया गोऱ्हे , अनिकेत कोळपे, किरण पोटे, अक्षय श्रीखंडे, दिव्याराणी पवार, मुकूंद राठी, तेजस देशमुख, प्राची जोशी व तेजस वालझडे यांची वार्षिक पॅकेज रू ३. ३६ लाखांवर निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे वेगवेगळ्याा कंपन्यांना अभिप्रेत असणारे अभियंते तयार होत असल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असल्याचे श्री कोल्हे यांनी शेवटी सांगीतले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके, सर्व विभाग प्रमुख व शाखा निहाय टी अँड पी समन्वयक उपस्थित होते.



