कोल्हार दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-दर्जेदार शिक्षणासोबतचं आदर्श नागरीक घडविण्यात प्रवरा शैक्षणिक संकुल हे अव्वल स्थानावर आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरचं विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमातून आदर्श नागरीक घडविण्याचे काम कोल्हारच्या महाविद्यालयात होत असून म्हणूनचं दुस-यादा नॅक साठी होणारे परीक्षण ही महाविद्यालयासाठी गौरवपूर्ण बाब असून नॅक नामांकनासाठी कोल्हारच्या कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाची तयारी पूर्ण झाल्याची माहीती प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी दिली.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, कोल्हारला राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोर ची टिम बुधवार दि. २० जुलै आणि गुरुवार दि. २१ जुलै २०२३ रोजी भेट देत आहे. यानिमित्ताने आयोजित माध्यमशी संवाद साधतांना डॉ. आहेर बोलत होते. २०१४-१५ नंतर दुसऱ्यांदा नॅक साठी नामांकन होत आहे. १९९९ मध्ये सुरु झालेल्या या महाविद्यालयात ग्रामीण भागातील ५६० विद्यार्थी पदवीसह पदवीत्तर शिक्षण घेत आहे.
शैक्षणिक सुविधा बरोबरचं संस्थेचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी पुर्ण होत आहे. महाविद्यालयामध्ये पायाभूत सर्व सेवा-सुविधा बरोबरचं मुलीसाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून प्रवरेची वेगळी ओळख आहे. कौशल्य विकास केंद्र,नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ, उच्च शिक्षीत प्राध्यापक, सौर ऊर्जाचा वापर, पर्यावरण पुरक परिसर, प्लेसेंमेट विभाग शिवाय शासकीय शिष्यवृत्ती बरोबरचं गरीब विद्यार्थी सहाय्य निधी योजना, कमवा व शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, पोलिस आर्मी प्रशिक्षण केंद्र या सुविधा बरोबरच अभ्यासपूरक उपक्रम, विद्यार्थी शिक्षक दत्तक गाव योजना, करीयर कट्टा, विद्यार्थी आरोग्य विमा, महीला सक्षमीकरण, लघु संशोधन प्रकल्प याद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यावर भर असतो.
महाविद्यालयातून २४८ विद्यार्थ्याना प्लैसमेंट देण्यात आली असून विविध कंपन्याशी २४ शैक्षणिक करार करण्यात आले आहेत.याशिवाय विविध परिसंवाद,चर्चासञ,कार्यशाळा आणि प्रक्षेञ भेटीतून करीअर मार्गदर्शन होत असते असे डॉ. आहेर यांनी सांगितले.
मुलींच्या शिक्षणात कोल्हार महाविद्यालय हे अग्रेसर असून या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याबरोबरचं शेतक-यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याने नोकरी स्वयंरोजगार आणि शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने फायदा होत आहे.महाविद्यालयास देश पातळीवरील
पर्यावरण संवर्धनातील सर्वोत्कृष्ट विस्तार उपक्रम हा पुरस्कार प्राप्त आहे.



