spot_img
spot_img

खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालयाचे व्हॉलीबॉल संघ राहाता तालुक्यात उपविजेता

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालयाचा संघ तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत उपविजेता ठरला आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा १४ व १९ वयोगट मुलींच्या संघांचे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सैनिकी शाळा लोणी येथे दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी येथे पार पडल्या. या स्पर्धेत १४ व १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत राहता तालुक्यात उपविजेतेपद मिळवले अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक के.एम.म्हस्के यांनी दिली.सदर संघास क्रीडा शिक्षक सुनिल चोळके यांचे मार्गदर्शन लाभले.

या विजयी संघास राज्याचे महसूल,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखेपाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री श्री.आण्णासाहेब म्हस्के पाटील, लोकप्रिय खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे , स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष, सरपंच, गोगलगाव ग्रामस्थ तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!