श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील गणेशा ते कोठा या जवळपास ७ किलोमीटर रस्त्याच्या दर्जा उन्नतीकरन कामासह श्रीगोंदा गावाचे ग्रामदैवत संत श्री शेख महमंद महाराज मंदिर परिसराच्या सुशोभीकरण, दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन वास्तुचे उद्घाटन कार्यक्रमाचे शनिवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता अहमदनगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्याच्या ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या विविध विकास कामांचे शुभारंभ होत असून गणेशा ते कोठा या मार्गासाठी सहा कोटी रुपये, एक कोटी खर्चून संत श्री महमंद महाराज मंदिर सुशोभीकरण आणि दीड कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन वस्तूसाठी खा.विखे यांच्या प्रयत्नातून तसेच आ. पाचपुते यांच्या मार्गदर्शनातून निधी मंजूर करून ही विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामाचा शुभारंभ चिंभळे तालुका श्रीगोंदा येथे तसेच संत श्री महमंद महाराज मंदिर परिसरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमास समस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिरसगाव बोडखा, तसेच श्रीगोंदाच्या वतीने करण्यात आले आहे.



