spot_img
spot_img

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अवैद्य धंद्यावाल्यांचा सुळसुळाट पोलिसांचे दुर्लक्ष

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):- महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ अवैधरीत्या मावा व गुटक्याची राजरोज पणे विक्री सुरू असून येथील टपरी धारकांची चांगलीच दादागिरी वाढली आहे राहुरीच्या पोलीस निरीक्षकांनी विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे

राज्यभरात नावलौकिक असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ दुकानदारा वेगवेगळ्या दुकानदारांनी आपले ठाण मांडले असून दिवस रात्रंदिवस मावा व गुटक्याची विक्री तेजीत सुरू आहे त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या लहान थोरांसह शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी मावा गुटख्याच्या आहारी गेल्याने व्यसनाधीन झाले आहेत त्यामुळे पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे विद्यापीठातील शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने दैनंदिन विद्यार्थ्यांची गर्दी ही मावा गुटक्याच्या टपरीवर जास्त प्रमाणात आढळून येत आहे

त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस स्थानक परिसरात मावा गुटक्याच्या तलबीसाठी गर्दी करून राहतात यात विद्यापीठाचे कर्मचारी व अधिकारी ही कमी नाहीत सकाळ दुपार संध्याकाळ या वेळेत चहा घेण्याच्या नावाखाली चहाच्या टपऱ्यावर माव्याच्या टपऱ्यावर कर्मचारी व अधिकारी तास न तास न तास काम ऐवजी वेळ घालवत आहेत चहाच्या टपऱ्यावर व माव्या गुटख्याच्या टपऱ्यावर विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी येत असून तास न तास वेळ काढूपणा करत आहेत विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्याने विद्यापीठातील कामकाजाबाबतचा कारभार चांगला चव्हाट्यावर आला आहे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लक्ष घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!