spot_img
spot_img

युवा नेते प्रदीप बनसोडे यांच्या वाढदिवसानिम्मित इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-आर पी आय आठवले गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष श्री प्रदीप बनसोडे यांच्या वाढदिवसानिम्मित बुधवार दि ११  ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४  वाजता ह भ प श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन राहाता येथील वीरभद्र प्रांगणात करण्यात आले आहे.

श्री प्रदीप बनसोडे यांनी अल्पावधी काळामध्ये   युवकांच्या मनावर राज्य केले असून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केलेले असून राहाता तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात त्यांना मानणारा  मोठा वर्ग आहे. केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचे ते निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या मित्र परिवाराकडून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदीप बनसोडे मित्र मंडळ यांचे वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!