कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- भागवत कथा श्रावणाचा आनंद हा दुर्लभ योग आहे भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकाच्या मनात भक्ती प्रेम जिज्ञासा असावी लागते भक्ती जिज्ञासा असलेला प्रत्येक रसिक भाविक भागवत कथेचा अधिकारी असून तोच भागवत कथेचा खरा आनंद घेऊन धन्य होतो असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे दिनांक २३ जुलै ते ३० जुलै दरम्यान येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भागवत कथा यज्ञ सोहळ्याचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, कोल्हार बुद्रुक चे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, सचिव संपत कापसे, विखे पाटील कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, धनंजय दळे भगवतीपुरचे माजी सरपंच खर्डे, नवनाथ महाराज म्हस्के, मधु महाराज कडलग, भगवान महाराज डमाळे, मधुकर खर्डे, गोरक्ष खर्डे आदीसह कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नवनाथ महाराज म्हस्के, ॲड. सुरेंद्र खर्डे यांनी मनोगत व्यक्त केले व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले.



