spot_img
spot_img

प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक जलतरण स्पर्धा

लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये १० व्या आंतरसदनीय वार्षिक जलतरण स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या. अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत पेशवा व मोरया सदनाने प्रथम क्रमांक मिळवून वार्षिक जलतरण करंडक पटकावला.अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक रवींद्र भणगे यांनी दिली.

पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रोझमीन बेलीम होत्या. आंतरसदनीय जलतरण स्पर्धा पेशवा सदन मोरया सदन महाराणा सदन छत्रपती सदन या चार सदनांमधून व १२,१४, व १७ या वयोगटात घेण्यात आल्या.अतिशय चुरशीच्या झालेल्या या वार्षिक जलतरण स्पर्धेत मोरया व पेशवा सदनाने प्रथम क्रमांक पटकावला . समारंभाचे प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना सुवर्णपदक रजतपदक कास्यपदक देण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. रोझमीन बेलीम यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व व्यायामाचे महत्त्व विशद केले.कठोर परिश्रम, प्रयत्नात सातत्य,चिकाटी व जिद्द ही यशाची त्रिसूत्री त्यांनी सांगितली.पराभव आणि विजय हा खेळाचा एक भाग आहे असे ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने शालेय जीवनात सर्व क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा, असा मूलमंत्र त्यांनी दिला. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षिक श्री गागरे पी. के. हॉस्टेल समन्वयक सनातना राऊत, क्रीडा संचालक किरण कडसकर उपस्थित होते. सदर क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ. सय्यद जबिन यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!