राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-जि.प. प्राथमिक शाळा साकुरी या शाळेतील पदवीधर शिक्षक श्री . बाजीराव वामन बनसोडे व त्यांचे मोठे बंधू अशोकराव वामन बनसोडे यांनी आपले आई वडील कालकथित यमुनाबाई व वामन बापू बनसोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या शाळेतील इयता १ली ते ७वी च्या १५० विद्यार्थ्याना वह्या कंपास अंकलिपी पेन पेन्सिल रबर शार्पनर इत्यादी जवळजवळ २० हजार रुपयांचे शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले . मागील वर्षीही या बनसोडे बंधूंनी आईवडीलाच्या स्मृतिप्रित्यर्थ को-हाळे गावातील हायस्कूल व ४ जिल्हा परिषद शाळा यांना जवळवळ २ लाखांचे संगणक संच भेट दिले होते .
याप्रसंगी साकुरी गावच्या सरपंच मा . मेघनाताई दंडवते , उपसरपंच मा . रावसाहेब बनसोडे , सामाजिक कार्यकर्ते संदीप दंडवते , सुरेशदादा बनसोडे, सदस्य दिलिप बनसोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , मुख्याध्यापक अशोक गवळी सर, ज्योती गायकवाड (बनसोडे),मॅडम महेश बनसोडे मा . पं . सं सदस्या हेमलता , विलास बनसोडे सर , सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यकमात संदिपराव दंडवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले . अशोक बनसोडे,बाजीराव बनसोडे,विलास बनसोडे,अरुण बनसोडे सर यांनी मनोगते व्यक्त केली .



