टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील श्री. संत तुकाराम महाराज मंदिर सभा मंडपासाठी निधी मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामस्थांनी आज खा. सदाशिव लोखंडे यांची भेट घेवून श्री. संत तुकाराम महाराज मंदिर सभा मंडपा साठी खासदार निधीतून निधी मिळण्याची मागणी निवेदन देवून केली आहे.
यावेळी खा. सदाशिव लोखंडे यांना निवेदन देतांना शिवसेनेचे दादासाहेब कोकणे, नारायण काळे, रोहिदास पटारे, प्रा. जयकर मगर , माजी सरपंच बंडू पटारे, दिगबर पांडे बाबा, राजेन्द्र माने, द्वारकानाथ भालसिंग, लहानूभाऊ पवार आदी उपस्थित होते.



